हिंदुस्थानची लाखो सैनिकांची फौज आम्हाला घाबरवू शकत नाही, पाकिस्तानची डरपोक्ती

हिंदुस्थानची लाखो सैनिकांची फौज आम्हाला घाबरवू शकत नाही, अशी डरपोक्ती पाकिस्तानने केली आहे. तसेच हिंदु आणि मुस्लिम या दोन वेगळ्या संस्कृती आहेत म्हणूनच आपल्या पूर्वजांनी वेगळा देश निर्माण केला असेही पाकिस्तानने म्हटले आहे.

पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर यांनी हे विधान केलं आहे. मुनीर म्हणाले की पाकिस्तानमधील दहशतवादामुळे इथे परदेशी गुंतवणूक येत नाही. हा दहशतवाद पाकिस्तानचे भविष्य नाही ठरवू शकत. बलोचिस्तान आमच्या डोक्यावरचा मुकूट आहे. हिंदुस्थानची 10 लाखांची फौज आम्हाला घाबरवू शकत तर हे बलोचिस्तानचे दहशतवादी काय चीज आहेत असे मुनीर म्हणाले.आपला देश कसा निर्माण झाला हे आपल्या पुढच्या पिढ्यांना सांगा तसेच परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानाी लोकांनी आर्थिक मदत करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.