मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न

फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी बेल्जियमशी जवळून काम करत असल्याचे गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. चोक्सीला शनिवारी बेल्जियमच्या अँटवर्पमध्ये अटक करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जयस्वाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले. प्रत्यार्पणाच्या विनंतीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. आम्ही बेल्जियमच्या बाजूने जवळून काम करत आहोत. जेणेकरून चोक्सीला देशात खटल्याला सामोरे जावे लागेल, असेही ते म्हणाले.