हिंदुस्थानचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, जम्मू कश्मीरमध्ये चाहत्यांनी फोडले फटाके

दुबईत झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत हिंदुस्थानने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. या आनंदात जम्मू कश्मीरमध्ये क्रिकेट चाहत्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.

दुबईत हिंदुस्थानने पाकिस्तानवर ६ गडी राखत विजय मिळवला. हिंदुस्थानचा विजय झाल्यामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला भागात हिंदुस्थानच्या क्रिकेट चाहत्यांनी आतषबाजी करत आनंद साजरा केला.