
पुढील 15-20 वर्षांत हिंदुस्थानला 30,000 वैमानिकांची गरज भासणार आहे. कारण देशातील विमान कंपन्यांनी त्यांचे नेटवर्क वाढवण्यासाठी 1700 हून अधिक विमाने मागवली आहेत. सध्या जवळपास 800 विमाने आहेत, असे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजराकू राममोहन नायडू यांनी सांगितले. 200 प्रशिक्षणार्थी विमानांच्या ऑर्डरसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आताच्या घडीला सहा ते सात हजार वैमानिक कार्यरत असल्याचे नायडू यांनी नमूद केले.