हिंदुस्थानचे 2035 पर्यंत आपले स्वतःचे अंतराळ स्थानक असेल आणि त्याचे नाव ‘भारतीय अंतराळ स्थानक’ (बीएएस) असे असेल. तसेच 2040 पर्यंत हिंदुस्थानी नागरिकाला चंद्रावर पाठवण्याची योजना आखण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज दिली. देशाचे अंतराळ संशोधन अधिक व्यापक करण्यासाठी बीएएस बांधण्यात येत आहे. अंतराळ क्षेत्राचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारकडून नवीन कायद्यावर काम सुरू असल्याचे सिंह यांनी सांगितले. पुढील वर्षाच्या अखेरीस किंवा 2026 च्या सुरुवातीस ‘गगनयान’ मोहिमेअंतर्गत पहिला हिंदुस्थानी अंतराळवीर अंतराळात जाईल. याशिवाय ‘समुद्र’ मोहिमेअंतर्गत सहा हजार मीटर खोलीवर मानवाला कसे पाठवता येईल याची योजना आखली जात आहे.