अखेर न बाद होता 542 धावांचा नवा विश्वविक्रम विदर्भचा कर्णधार करुण नायरने स्वतःच्या नावावर लिहिला. विजय हजारे करंडकात उत्तर प्रदेशविरुद्ध खेळताना नायर 112 धावांवर बाद झाला. गेल्या चार सामन्यांत नाबाद खेळ करताना 112, 44, 163, 111 अशा अफलातून खेळय़ा केल्या होत्या. आज त्याने शतकांची हॅटट्रिक ठोकताना स्पर्धेतील चौथे शतकही झळकावले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू जेम्स फ्रँकलिनने 2010 साली सातत्यपूर्ण नाबाद खेळय़ा करत 527 धावा केल्या होत्या. आज करुणने नाबाद खेळींचा डाव 112 धावांच्या खेळीनंतर संपला. स्थानिक क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत जोशुआ वॅन हिर्डन (512), फखर जमान (455) आणि तौफिक उमर (422) यांनीच नाबाद खेळ करताना 400 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. करुण विजयाची हॅटट्रिक ठोकताना 112 धावांची खेळी साकारली. आज उत्तर प्रदेशच्या समीर रिझवीने 105 धावा करत संघाला 8 बाद 307 अशी मजल मारून दिली. यश राठोड (138) आणि करुण नायर (112) यांनी विदर्भच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.