टीम इंडिया चॅम्पियन! 25 वर्षानंतर बदला पूर्ण, न्यूझीलंडला पराभूत करत रोहितसेनेने जिंकले विजेतेपद

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. एकतर्फी झालेल्या सामन्यात रोहितसेनेने न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाने किवी संघाने दिलेले 252 धावांचे लक्ष्य केवळ 6 विकेट्स गमावून पूर्ण केले. टीम इंडियाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्माची याने 73 धावांची जबरदस्त खेळी केली. तर श्रेयस अय्यरने 48 धावा केल्या. केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांनी शेवटच्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली आणि हिंदुस्थानी संघाला लक्ष्यापर्यंत पोहोचवले.