नव्या वर्षात टीम इंडियाचा कसोटीत ‘दस’ का दम

नव्या वर्षात म्हणजे 2025 मध्ये हिंदुस्थानी संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही अखेरची पाचवी कसोटी 3 जानेवारीपासून सिडनी येथे सुरू होणार आहे. जर हिंदुस्थानी संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत फायनलमध्ये पोहोचला तर हिंदुस्थानला आणखी 1 कसोटी खेळण्याची संधी मिळेल. यानंतर टीम इंडियाची इंग्लंड दौऱ्यावर खरी ‘कसोटी’ लागणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

नव्या वर्षात खेळणार दहा कसोटी सामने

नवीन वर्षांत हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांमधील ही कसोटी मालिका हिंदुस्थानी भूमीवर खेळवली जाणार आहे. यानंतर हिंदुस्थानी संघ मायदेशात इंग्लंडविरुद्ध दुसरी कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ हिंदुस्थान दौऱ्यावर येणार आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका संघ या दौऱ्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. अशा प्रकारे हिंदुस्थानी संघ आगामी वर्षी म्हणजे 2025 मध्ये एकूण 10 कसोटी सामने खेळणार आहे, मात्र हिंदुस्थानी संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेतच्या अंतिम फेरीत पोहोचला तर मग एकूण 11 कसोटी सामने होतील.