IND vs AUS – केएल राहुलनंतर आता कर्णधार रोहित शर्मालाही दुखापत

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून हिंदुस्थानी संघासाठी एक वाईट बातमी आहे. केएल राहुलनंतर आता हिंदुस्थानी संघाचा कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी झाल्याचे वृत्त समोर येत असून चाहते चिंतेत आहेत. दरम्यान रोहितच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे कळते. त्याच्या दुखापतीवर तो आईसपॅक लावतानाही दिसला. यावेळी हिटमॅन वेदनेने रडताना दिसला.

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी दुसऱ्या सराव सत्रादरम्यान ही दुखापत झाली. जखमी झाल्यानंतर, रोहित शर्माने आपले गियर काढले आणि खुर्चीवर बसला तर फिजिओने बर्फाचा पॅक काढला. पॅक लावल्यावर रोहितच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या आणि नंतर फिजिओने रोहितचा डावा पाय खुर्चीवर ठेवला.

दुखापत तितकी गंभीर दिसत नव्हती. सूज कमी होईल याची खात्री करण्यासाठी फिजिओ खबरदारी घेत आहेत. बॉक्सिंग डे कसोटी सुरू होण्यास अजून काही वेळ शिल्लक आहे आणि रोहितला आशा आहे की, तोपर्यंत दुखापत बरी होईल.