टीम इंडियाचा ऑफस्पिनर आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना झाल्यानंतर अश्विनने निवृत्ती जाहीर केली. ॲडलेडमध्ये खेळलेला कसोटी सामना त्याचा शेवटचा कसोटी सामना होता.