India Tour Of England- इंग्लंड दौऱ्यातून रोहित शर्मा आऊट? विराट कोहलीही मुकण्याची शक्यता

IPL 2025 चा धमाका 22 मार्च पासून सुरू झाला आहे. 25 मेपर्यंत आयपीएलचा रणसंग्राम देशभरात रंगणार आहे. आपयपीएलच्या समाप्तीनंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळणार आहे. मात्र टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या दौऱ्यासाठी इंग्लंडला जाणार नसल्याचे वृत्त आहे. तसेच विराट कोहलीसुद्धा या दौऱ्याला मुकण्याची शक्यता आहे.

रोहित शर्माचा बॉर्डर-गावस्कर करंडकातील खेळ अत्यंत खराब राहिला होता. त्यामुळे तो आगामी इंग्लंड दौऱ्याला जाण्यास इच्छूक नसल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर विराट कोहली सुद्धा बॉर्डर-गावस्कर करंडकात काही खास कामगिरी करू शकला नव्हता. विराट कोहलीची दौऱ्यासाठी निवड होऊ शकते. परंतु तो सुद्धा दौऱ्यावर जाण्याच इच्छूक नसल्याच समजत आहे. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

बॉर्डर-गावस्कर करंडकात टीम इंडियाचा खेळ निराशाजनक राहिला होता. त्यामुळे टी इंडियाला 10 वर्षांनी करंडक 1-3 अशा फरकाने गमवावा लागला होता. तसेच जागतीक कसोटी चॅम्पियन्शीपच्या (WTC) फायनलमध्ये धडक मारण्याचे टीम इंडियाचे स्वप्न सुद्धा धुळीस मिळाले होते. या करंडकात रोहित शर्माला पाच डावांमध्ये 6.20 च्या सरासरीने फक्त 31 धावा करता आल्या होत्या. तसेच खराब कामगिरीमुळे सिडनी कसोटीमध्ये तो मैदानात उतरला नव्हता.