बांगलादेशच्या वाघांना टीम इंडिया करणार चितपट! 15 दिवसांत 6 सामने होणार, वेळापत्रक जाहीर

टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. याच वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यामध्ये उभय संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. 15 दिवसांत 6 सामन्यांचा थरार चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

टीम इंडियाचा बांगलादेश दौरा 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये प्रथम वनडे मालिका आणि त्यानंतर टी-20 मालिका खेळली जाणार आहे. 17 ऑगस्ट रोजी पहिला वनडे सामना आणि 20 ऑगस्ट रोजी दुसरा वनडे सामना मीरपूरमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर तीसरा वनडे सामना 23 ऑगस्ट रोजी चटगांवमध्ये खेळला जाईल. वनडे मालिका समाप्त झाल्यानंतर 26 ऑगस्टपासून टी-20 मालिकेचा थरार चटगांव येथून सुरू होईल. त्याचबरोबर मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 29 आणि 31 ऑगस्ट रोजी मीरपूरमध्ये खेळला जाणार आहे.