India Tour Of Australia – हिंदुस्थानच्या महिला ऑस्ट्रेलियात धमाका करणार! BCCI ने जाहीर केलं वेळापत्रक

IPL 2025 ची धामधूम देशात सुरू आहे. दररोज फलंदाजांच्या विस्फोटक फलंदाजीचा आणि गोलंदाजांच्या धारधार गोलंदाजीचा क्रीडा प्रेमी आनंद घेत आहेत. अशातच BCCI ने महिला क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या या दोऱ्यामध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20, वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याला फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका, तीन सामन्यांची वनडे मालिका आणि एक कसोटी सामना खेळला जाणार आहे. 15 फेब्रुवारी पासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. 15 फेब्रुवारी ते 6 मार्च या काळात उभय संघांमध्ये सामने खेळले जाणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये प्रथम टी-20 मालिका खेळली जाणार आहे. पहिला सामना 15 फेब्रुवारी (सिडनी), दुसरा सामना 19 फेब्रुवारी (कॅनबेरा) आणि तिसरा सामना 21 फेब्रुवारी (अॅडलेड) रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर 24 फेब्रुवारीपासून ब्रिस्बेन येथून उभय संघांमध्ये वनडे मालिकेला सुरुवात होईल. डे-नाईट स्वरुपात वनडे मालिका पार पडणार आहे. दुसरा वनडे सामना 27 फेब्रुवारी रोजी होबार्ट येथे आणि तिसरा वनडे सामना 1 मार्च रोजी मेलबर्न येथे रंगणार आहे. त्यानंतर एकमेव कसोटी सामना डे-नाईट स्वरुपात 6 मार्च ते 9 मार्च या कालावधीत खेळला जाणार आहे.