
अमेरिका आणि ब्रिटनसाठी गेली 30 वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय, अशी कबुली पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसीफ यांनी दिली. पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना सातत्याने पाठिंबा दिला आणि रसद पुरवली हा इतिहास राहिला आहे, असेही ते म्हणाले. यावरून पाकिस्तान जागतिक दहशतवादाला खतपाणी घालणारा आणि हिंदुस्थानी उपखंडात अस्थैर्य निर्माण करणारा दुष्ट देश असल्याचे सिद्ध झाले आहे. जग आता याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, अशा कठोर शब्दांत हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर पाकिस्तानला सुनावले.
हिंदुस्थानच्या संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधी आणि दूत योजना पटेल यांनी ‘व्हिक्टीम्स ऑफ टेररिझम असोसिएशन नेटवर्क’ या संयुक्त राष्ट्रांच्या उपक्रमासंदर्भातील बैठकीत पाकिस्तानला चांगलेच फैलावर घेतले.
एका देशाच्या शिष्टमंडळाने संयुक्त राष्ट्रांच्या मंचाचा गैरवापर हिंदुस्थानविरोधात निराधार आरोप करून अपप्रचार पसरवण्यासाठी करणे हे दुर्दैवी असल्याचे त्या म्हणाल्या.
- पाकिस्तानी हॅकर्सनी आज राजस्थानच्या शिक्षण विभागाची वेबसाईट हॅक करून आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला.
- काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन घेण्याची विनंती केली.