बांगलादेशच्या उच्चायुक्तांना हिंदुस्थानचे समन्स, दोन देशांत तणाव

गेल्या काही दिवसांपासून हिंदुस्थान आणि बांगलादेशच्या सीमेवर तणावाची स्थिती असून बांगलादेशने हिंदुस्थानच्या उच्चायुक्तांना समन्स बजावताच हिंदुस्थाननेही बांगलादेशच्या  उच्चायुक्तांना आज समन्स बजावले. सीमेवर सुरक्षा पुंपण उभारताना कराराचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. तर बांगलादेशनेही हिंदुस्थानने सीमेवर पाच ठिकाणी सुरक्षा कुंपण उभारण्याचा प्रयत्न करताना दोन्ही देशांमधील कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. बांगलादेशचे उच्चायुक्त मोहम्मद नुराल इस्लाम हे आज दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयातून बाहेर पडताना दिसले.

हिंदुस्थानचे उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी बांगलादेशकडून सीमेवर कराराचे उल्लंघन होत असल्याबद्दल चींता व्यक्त केली आहे. याप्रकरणी बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने रविवारी भारतीय उच्चायुक्तांना समन्स बजावले, हिंदुस्थान- बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या हालचालींबद्दल बांगलादेशने चिंता व्यक्त केली. दोन्ही देशात सीमावाद सुरू असताना हे समन्स बजावण्यात आले होते.