600 टन आयफोन अमेरिकेला पाठवले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात मालांवर मोठा टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यापासून जगभरात ट्ररिफ युद्ध सुरू झाले आहे. ही चर्चा सुरू असताना अ‍ॅपलने हिंदुस्थानातून 15 लाख आयफोन अमेरिकेला पाठवले आहेत. या आयफोन्सचे वजन तब्बल 600 टन आहे. स्मार्टफोन्सच्या एक्सपोर्टमध्ये आयफोन्सची भागीदारी जवळपास 1.5 लाख कोटी रुपये इतकी आहे. हिंदुस्थानात गेल्या काही वर्षांत आयफोनची मॅन्युफॅक्चरिंग वेगाने वाढली आहे. अ‍ॅपलच्या कॉन्ट्रक्टर मॅन्युफॅक्चरर फोक्सकॉनने गेल्या वर्षी देशात जवळपास 1.2 कोटी आयफोन्स बनवले.