द व्हिक्टर अ‍ॅक्सलसेन, अ‍ॅन से यंग यांना अजिंक्यप

पॅरिस ऑलिम्पिक विजेता डेन्मार्कचा व्हिक्टर अ‍ॅक्सलसेन आणि दक्षिण कोरियाची अ‍ॅन से यंग यांनी रविवारी इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. नवी दिल्लीतील के. डी. जाधव स्टेडियममध्ये ही स्पर्धा पार पडली. दहा वर्षांमध्ये सहाव्यांदा इंडिया ओपन फायनलमध्ये खेळणाऱया अॅक्सलसेनने अंतिम लढतीत हाँगकाँगच्या ली चेऊक यिऊचा 21-16, 21-8 असा पराभव करून आपला तिसरा इंडिया ओपन पुरुष एकेरीचा किताब जिंकला. अॅन से यंगला महिला एकेरीच्या अंतिम फेरीत थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगचा 21-12, 21-9 असा पराभव करण्यात फारसा त्रास झाला नाही.