IND Vs NZ : दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठा बदल, या खेळाडूला दिली संधी

पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा दारुण पराभव केला. पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर आता बीसीबीआयने टीम इंडियात एक मोठा बदल केला आहे. बीसीसीआयने रविवारी दुसऱ्या व तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला असून त्यात फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर याचा समावेश केला आहे.

टीम इंडिया व न्यूझीलंडमधील दुसरा सामना 24 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात तर तिसरा सामना हा 1 ते 5 नोव्हेंबरदरम्यान मुंबईमध्ये खेळवला जाणार आहे. पुण्यातील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना मदत करते त्यामुळे संघात वॉशिंग्टन सुंदर याचा समावेश करण्यात आला आहे.

टीम इंडिया – 

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराझ खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर