हिंदुस्थानला 20 हजार वैमानिकांची गरज

देशाला येत्या काही वर्षांत तब्बल 20 हजार वैमानिकांची गरज भासणार असल्याचे नागरी उड्डाणमंत्र्यांनी सांगितले. आपला देश जगाच्या हवाई उड्डाण बाजारपेठेत अग्रेसर असून दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगती करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात वैमानिकांची मोठय़ा प्रमाणावर गरज भासणार आहे, असे नायडू यांनी म्हटले. उड्डाण भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढच्या पाच वर्षांत देशात 50 हून अधिक विमानतळे असतील. तर 10 वर्षांत विमानतळांची संख्या 157 पर्यंत वाढेल, असेही ते म्हणाले.