येत्या 15 ऑक्टोबरपासून मान्सून देशातून निरोप घेणार असून थंडीची चाहूल लागेल. आयएमडीच्या मते, या वर्षी देशात 8 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी पडू शकते. यंदाचा हिवाळा सामान्यपेक्षा कडक राहील. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, उत्तर हिंदुस्थान, खास करून दिल्ली- एनआरसी आणि आजूबाजूच्या भागात जास्त थंडी पडेल. आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले, यंदा मान्सून पाच दिवस उशिरा निघाला. महाराष्ट्रातून 10 ते 12 ऑक्टोबर, तर देशातून 18 ऑक्टोबरच्या सुमारास परतण्याचा अंदाज आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये एल निनोची 71 टक्के शक्यता आहे.