
हिंदुस्थानात तयार करण्यात येणाऱ्या दारूला जगभरात मागणी वाढली आहे. या दारूमध्ये रम, वाईन, बीयर आणि जिन या प्रकारांच्या मद्य पेयांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या 37.05 कोटी डॉलर किमतीची दारूची निर्यात केली जात आहे, परंतु आगामी 2030 पर्यंत हाच आकडा 1 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असा अंदाज सीआयएबीसीकडून आयोजित करण्यात आलेल्या अल्कोबेव इंडिया 2025 च्या संमेलनात एपीडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी वर्तवला आहे.