स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्सने सर्वात वेगवान इंटरनेट उपलब्ध करून देणाऱ्या देशांची यादी प्रसिद्ध केली आहे. या जारी केलेल्या यादीनुसार, वेगवान इंटरनेट उपलब्ध करून देणाऱ्या जगभरातील देशांच्या यादीत हिंदुस्थान 25व्या स्थानावर आहे. हिंदुस्थानातील काही राज्यांत 5जी इंटरनेट सेवा उपलब्ध करण्यात आली असली तरी त्यात म्हणावी तशी स्पीड मिळत नाही. जगाच्या तुलनेत वेगवान इंटरनेट मिळवण्यात हिंदुस्थानचा टॉप 10 मध्येसुद्धा समावेश नाही. त्यामुळे हिंदुस्थानला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. हिंदुस्थानात चीननंतर सर्वात अधिक इंटरनेट युजर्स आहेत. म्हणजेच जगभरातील युजर्सच्या सरासरी संख्यामध्ये हिंदुस्थानात 50 टक्के युजर्स आहेत. हिंदुस्थानात 900 मिलियनहून अधिक इंटरनेट युजर्स आहेत. नोव्हेंबर 2024 पर्यंतच्या मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये हिंदुस्थान जगभरात 25 व्या स्थानावर आहे. हिंदुस्थानात सरासरी डाऊनलोड स्पीड 100.78 एमबीपीएस आणि अपलोड स्पीड 9.08 एमबीपीएस आहे.
वेगवान इंटरनेट असलेले देश
संयुक्त अरब अमीरात 442 (एमबीपीएस)
कतार 358 (एमबीपीएस)
कुवेत 264 (एमबीपीएस)
बुल्गारिया 172 (एमबीपीएस)
डेन्मार्क 162 (एमबीपीएस)
दक्षिण कोरिया 148 (एमबीपीएस)
नीदरलँड 147 (एमबीपीएस)
नॉर्वे 145.74 (एमबीपीएस)
चीन 139.58 (एमबीपीएस)
हिंदुस्थान 100.78 (एमबीपीएस)