हिंदुस्थानकडे जगातील सर्वात शक्तिशाली स्फोटक

हिंदुस्थानने जगातील सर्वात शक्तीशाली स्फोटक तयार केले आहे. हे स्फोटक ट्रायनिट्रोटोल्युएन ( टीएनटी) पेक्षा दुप्पट घातक आहे. त्याला ‘सेबेक्स-2’ असे नाव देण्यात आलेय. सर्वात घातक  अशा नॉन न्यूक्लिअर स्फोटकांपैकी एक आहे. यामुळे हिंदस्थानची ताकद आणखी वाढली आहे. नौदलाने ‘सेबेक्स-2’ चे यशस्वी चाचणी घेतली आहे. स्फोटकांची तीव्रता ‘टीएनटी’वरून मोजली जाते. ‘टीएनटी’ हे असे प्रमाण आहे, ज्याच्यावरून स्फोटक किती विध्वसंक ठरू शकतो. या प्रमाणात पाहिले तर ‘सेबेक्स-2’ हे दुपटीहून अधिक विनाशकारी आहे.

सध्या हिंदुस्थानच्या नॉन न्यूक्लिअर ब्रह्मोस क्षेपणास्त्रामध्ये सर्वात घातक विस्फोटक वापरले जाते. ज्याची टीएनटी समतुल्यता 1.50 आहे. जगातील बहुतेक वॉरहेड्समध्ये 1.25-1.30 दरम्यान टीएनटी समतुल्यता असते. सेबेक्स 2 मध्ये टीएनटी समतुल्य 2.01 आहे. म्हणजे आतापर्यंतचे सर्वात घातक स्फोटक आहे.

सेबेक्स 2 बनवणारी कंपनी आणखी एका स्फोटकावर काम करत आहे. ते स्फोटक टीएनटी पेक्षा 2.3 पट जास्त घातक असेल.