
हिंदुस्थान आणि फ्रान्स नौदलाचा वरुण अभ्यास अरबी समुद्रात पार पडला. 19 ते 22 मार्च अशा तीन दिवस चाललेल्या या अभ्यासाचा उद्देश म्हणजे हिंदुस्थान-फ्रान्स या दोन देशांतील संबंध अधिक दृढ करणे होय. या अभ्यास दौऱ्यात हिंदुस्थानच्या आयएनएस विक्रांतने भाग घेतला, तर फ्रान्सच्या चार्ल्स गॉलने सहभाग घेतला.
विक्रांतने लढाऊ विमाने, जहाज, फिग्रेट आणि स्कॉर्पिन श्रेणीच्या पाणबुडीने अभ्यासात भाग घेतला. दोन्ही देशांतील नौदलांमधील अंतर-संचालन अधिक मजबूत करणे होय. दोन्ही नौदलांमधील हवेतून आणि पाण्याखालून येणाऱ्या अनेक पर्यावरणीय धोक्याला नेस्तनाबूत करणे होय. याआधी दोन्ही देशांतील वरुण अभ्यास 2 ते 4 सप्टेंबर 2024 रोजी भूमध्य समुद्रात पार पडले होते. दोन्ही देशांतील सैन्य संबंध अधिक मजबूत करण्यासाठी सर्वप्रथम 1991 मध्ये या दोन देशांमध्ये अभ्यास सुरू करण्यात आला होता.