बांगलादेश-चीनची मैत्री, हिंदुस्थान सतर्क; चिकन नेकच्या मजबुतीकरणासाठी प्रयत्न

बांगलादेशने चीनच्या विस्तारवादाला खतपाणी घालत हिंदुस्थानची कोंडी करण्याच्या हेतूने त्यांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन दिले आहे. बांगलादेश-चीनची मैत्री हिंदुस्थानसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. तसेच चीनने हिंदुस्थानसाठी महत्त्वाच्या असलेल्या आणि देशाला ईशान्य भारताशी जोडणाऱ्या ‘चिकन नेक’ धोरणात्मकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. त्यामुळे हिंदुस्थानने आता या भागाच्या मजबुतीकरणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

पश्चिम बंगालमधील चिकन नेक हा 22 किमी रुंद अरुंद धोरणात्मक कॉरिडॉर आहे जो ईशान्येकडील राज्यांना देशाशी जोडतो. बिम्सटेक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर थायलंडला जात असताना नवी दिल्लीत त्यांनी यावर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. बांगलादेशने मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस आणि पंतप्रधान मोदी यांच्यात बैठकीची मागणी केली. जर द्विपक्षीय बैठक झाली तर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि युनूस यांच्यातील ही पहिलीच प्रत्यक्ष भेट असेल. या राजनैतिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर युनूस यांनी भारताच्या ईशान्येकडील राज्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा आणि बांगलादेशने चीनला संभाव्य गुंतवणुकीसाठी केलेल्या प्रयत्नांचा समावेश आहे त्यामुळे ‘चिकन नेक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या सिलीगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेबद्दल हिंदुस्थान सतर्क झाला आहे.

सध्याच्या भू-राजकीय बदल पाहता हिंदुस्थानने या महत्त्वपूर्ण कॉरिडॉरचे संरक्षणासाठी सुरक्षा उपाययोजना वाढवल्या आहेत. हिंदुस्थानी लष्कराने सिलिगुडी कॉरिडॉरला सर्वात मजबूत संरक्षण रेषा म्हटले आहे. त्यामुळे कोणत्याही संभाव्य धोक्यांचा सामना करणे शक्य होते. कॉरिडॉरजवळील सुकना येथे मुख्यालय असलेले त्रिशक्ती कॉर्प्स, प्रदेश सुरक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. हे कॉर्प्स राफेल लढाऊ विमाने, ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि प्रगत हवाई संरक्षण प्रणालींसह अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे.

कॉरिडॉरच्या सुरक्षेबाबत देशाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. ‘चिकन नेक’ हा देशासाठी मजबूत लष्करी प्रदेश आहे. या भागातूनच पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील भआगात सैन्य जलद गतीने तैनात केले जाऊ शकते. त्यामुळे हिंदुस्थानने या भागाकडे विशेष लक्ष दिले आहे. भारतीय हवाई दलाने मिग विमानांसह हाशिमारा एअरबेसवर राफेल लढाऊ विमानांचा एक स्क्वॉड्रन तैनात केला आहे. संभाव्य धोके रोखण्यासाठी कॉरिडॉरमध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची एक रेजिमेंट तैनात करण्यात आली आहे. कोणत्याही हवाई घुसखोरीला रोखण्यासाठी भारताने या प्रदेशात एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केली आहे. त्रिशक्ति कॉर्प्स वारंवार ऑपरेशनल तयारी वाढवण्यासाठी टी-90 टँकसह लाईव्ह-फायर ड्रिलसह लढाऊ सराव आयोजित करते.