हिंदुस्थानची पहिली हायड्रोजन ट्रेन सज्ज, रेल्वे धुराऐवजी सोडणार पाणी

हिंदुस्थानमधील पहिली हायड्रोजनवर धावणारी रेल्वे सज्ज झाली आहे. ही ट्रेन अवघ्या दोन ते तीन महिन्यांत म्हणजेच डिसेंबरच्या अखेरमध्ये किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात सोनीपत ते जिंददरम्यान धावताना दिसणार आहे. ही रेल्वे प्रदूषणमुक्त असणार आहे. या अंतरावर डिझेलवर चालणारी ट्रेन 90 किलोमीटरसाठी 964 किलो कार्बन उत्सर्जित करते, परंतु आता अजिबात प्रदूषण होणार नाही.

तीन वर्षांत 30 हायड्रोजन रेल्वे

या मार्गावरील चाचण्या यशस्वी झाल्यानंतर माथेरान हिल रेल्वे (महाराष्ट्र), दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, कालका-सिमला रेल्वे, कांगडा व्हॅली, निलगिरी माऊंटन रेल्वे हेरिटेज आणि माऊंटन मार्गांवर येत्या तीन वर्षांत 30 हायड्रोजन रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वे प्रयत्न करणार आहे. रेल्वेने यासंबंधी खास योजना आखली आहे.

पाण्यापासून हायड्रोजन निर्मिती

जिंद रेल्वे स्थानकावर पाण्यापासून रेल्वेला दर तासाला 40 हजार लिटर पाणी लागणार आहे. त्यामुळे जिंद रेल्वे स्थानकावरही भूमिगत साठवणूक व्यवस्था तयार केली जात आहे. स्थानकाच्या छतावर साचलेले पाणी या ठिकाणी पोहोचणार आहे. ऑक्सिजन व हायड्रोजन निर्मिती होईल.