टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये शानदार कामगिरी बजावत हिंदुस्थानी संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला. गुयानामध्ये प्रोविडन्स स्टेडियममध्ये 27 जून रोजी हिंदुस्थान आणि इंग्लंडमध्ये सेमीफायनल होणार आहे. मात्र सामन्यावर पावसाचे संकट उभे ठाकले आहे. पाऊस आल्यास सामना रद्द होईल. मग हिंदुस्थानी संघ फायनलमध्ये जाणार की फायनलमधून बाहेर होणार याची उत्सुकता क्रिकेट प्रेमींना लागली आहे.
सेमीफायनलमध्ये ‘राखीव दिवस’चा नियम काय?
दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आयसीसीने राखीव दिवस ठेवलेला नाही. सेमीफायनलमध्ये पाऊस आल्यास 4 तास 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ निर्धारीत करण्यात आला आहे. मात्र अतिरिक्त वेळेतही सामना होऊ शकला नाही आणि सामना रद्द झाला, तर आपल्या ग्रुप स्टेजवर टॉपला असलेला संघ थेट फायनलमध्ये दाखल होणार आहे. म्हणजेच हिंदुस्थानी संघालाच याचा फायदा होणार आहे. सुपर-8 मध्ये ग्रुप – 1 मध्ये टॉपवर राहत हिंदुस्थानी संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे. जर सेमीफायनलमध्येही पावसामुळे सामना रद्द झाला तर हिंदुस्थानी संघाचे फायनलमध्ये स्थान निश्चित असेल.
टी20 वर्ल्ड कप मधील हिंदुस्थान-इंग्लंडचे संघ
हिंदुस्थानी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद सिराज
इंग्लंड संघ : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जोनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करण, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, क्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, आदिल राशिद, फिल साल्ट, रीस टॉप्ली आणि मार्क वुड