
जम्मू कश्मीरच्या पहलगाममध्ये हिंदुस्थानी पर्यटकांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हिंदुस्थान सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले होते. आता पाकिस्तान सोशल मीडिया अकाऊंट्स हिंदुस्थानबाबतीत अनेक अफवा पसरवत होते. त्यामुळे सरकारने या चॅनेल्संना हिंदुस्थानात बंदी घातली आहे.
हिंदुस्थान सरकारे पाकिस्तान सरकारच्या अधिकृत एक्स अकांऊट्स हिंदुस्थानी युजरसाठी ब्लॉक केले आहेत. आता हिंदुस्थानी नेटकरी या अकांऊट्सला भेट देऊ शकत नाहीत. हिंदुस्थान सरकारने हा डजिटल ब्लॅकआऊट केला आहे. हिंदुस्थान सरकार कुठल्याही परदेशी खोटा प्रचार आणि देशविरोधी कारवाया सहन करणार नाही असा संदेश या निर्णयातून हिंदुस्थानने दिला आहे.