धक्कादायक! चीनने लडाखमध्ये वसवली दोन शहरे, मोदी सरकार फक्त इशारे देत राहिले

केंद्रातील मोदी सरकार फक्त इशारे देत राहिल्यामुळे चीनची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. आता तर चीनने लडाखमध्ये घुसखोरी करून थेट दोन काऊन्टी (शहरे) वसविले असून, केंद्र सरकारनेच ही धक्कादायक माहिती लोकसभेत दिली. दरम्यान, चीनच्या या घुसखोरीचा डिप्लोमॅटिक पद्धतीने विरोध करणार अशी भूमिका सरकारने घेतली आहे.

लोकसभेत शुक्रवारी चीनकडून सातत्याने हिंदुस्थानच्या हद्दीत होणाऱ्या घुसखोरीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याला लेखी उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी चीनने लडाखचा भाग असलेल्या होटान परिसरात दोन नवीन काऊन्टी निर्माण केल्याचे मान्य केले.

डिसेंबरमध्ये घोषणा केली होती

होटानमध्ये हेआन आणि होकांग या दोन शहरांची निर्मिती करणार असल्याची घोषणा चीनने केली होती. त्यावेळी हिंदुस्थानने विरोध केला होता. होटान हा परिसर लडाखचाच भाग आहे असे केंद्राने म्हटले होते. त्यानंतरही चीनने ही दोन शहरे वसविली. दरम्यान, चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधण्याचीही घोषणा केली होती.

नगरपालिकांप्रमाणे काम

n सीमेजवळील शिनजिंयांगचा भाग हा लडाख प्रांताचाच भाग आहे. येथीलच होटान भागात घुसखोरी करून दोन शहरे चीनने निर्माण केली.

n काऊन्टीला चीनमध्ये श्यान म्हणतात.

n नगरपालिकेप्रमाणे येथे काम चालते. यात शहरी आणि ग्रामीण दोन भाग असतात.

n चीनने दोन नवीन काऊन्टी निर्माण केल्या असल्या तरी हिंदुस्थानच्या स्थितीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही पिंवा जबरदस्तीने केलेल्या ताब्याला वैधताही मिळणार नाही. केंद्र सरकार डिप्लोमॅटिक (राजनैतिक) पद्धतीने याचा विरोध करणार असल्याचे कीर्ती वर्धन सिंह यांनी सांगितले.