बांगलादेशच्या सीमेवर तणाव, आंदोलनकर्त्यांनी माल वाहतूक रोखली

बांगलादेशात मागील काही काळापासून तणावाची स्थिती आहे. त्यामुळे त्यांचे हिंदुस्थानसोबतचे संबंधही बिघडले आहेत. हिंदूंवरील हिंसाचार, हिंदुस्थानी झेंडय़ाची अवहेलना आणि पुजारी तथा इस्कॉन पुंडलिक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेमुळे आणखी वातावरण चिघळले आहे. हिंदुस्थानी जनतेमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. सोमवारी पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वात हिंदू संघटना, कार्यकर्ते, सामान्य नागरिक आणि भिक्षूंनी आंदोलन केले. बांगलादेशच्या सीमेवर पोहोचताच आंदोलनकर्त्यांनी माल वाहतूक करणारे सर्व ट्रक अडवले. त्यामुळे बांगलादेशसोबतच्या व्यापारावर दिवसभर परिणाम झाला. कोणत्याही अटीशिवाय कृष्ण दास यांची सुटका करा, अशी मागणी करत आंदोलकांनी बांगलादेशच्या सीमेवरील माल वाहतूक 24 तास रोखून धरली.