
हिंदुस्थान व न्यूझीलंड या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या दोन तुल्यबळ संघांमध्ये उद्या 9 मार्च रोजी दुबईत ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी ‘रन’युद्ध रंगणार आहे. तब्बल 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा उभय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भिडतील. त्यामुळे न्यूझीलंड 2000 सालातील जेतेपदाची पुनरावृत्ती करणार की हिंदुस्थान त्या वेळच्या पराभवाचे उट्टे काढून जेतेपदावर मोहोर उमटविणार याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील.