अमेरिकेच्या टॅरिफविरोधात हिंदुस्थान आणि चीनने मिळून लढा द्यावा, चीनचे मत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर टॅरिफ लादले आहे. या टॅरिफविरोधात हिंदुस्थान आणि चीनने मिळून लढा दिला पाहिजे असे मत चीनने व्यक्त केले आहे. तसेच हिंदुस्थान आणि चीनचे संबंध हे एकमेकांना पूरक आणि हितावर आधारलेले आहेत असेही चीनने म्हटले आहे.

चीनच्या हिंदुस्थान दुतावासाच्या प्रवक्त्या यु जिंग यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर टॅरिफ लादले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी हिंदुस्थान आणि चीनने एकत्र लढलं पाहिजे. तसेच चीन आणि हिंदुस्थानचे आर्थिक आणि व्यापारी संबंध हे पूरक असून ते एकमेकांच्या हितावर आधारित आहेत. अमेरिकेने लादलेल्या टॅरिफविरोधात हिंदुस्थान आणि चीनने मिळून लढलं पाहिजे असेही जिंग म्हणाल्या.