Exit Poll : हरयाणात भाजपचा गड उद्ध्वस्त होणार, जम्मू कश्मीरमध्ये इंडिया आघाडी मारणार बाजी

हरयाणा आणि जम्मू कश्मीरमध्ये भाजपचा दारूण पराभव होऊ शकतो. शनिवारी अनेक एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यानुसार हरयाणात भाजपची सत्ता जाऊ शकते. तर जम्मू कश्मीरमध्ये इंडिया आघाडीला यश मिळण्याची शक्यता आहे. जम्मू कश्मीर आणि हरयाणा दोन्ही राज्यात 90 जागा आहेत. जम्मू कश्मीरमध्ये तीन तर हरयाणात एका टप्प्यात मतदान पार पडलं होतं.

हरयाणा एक्झिट पोल

दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार भाजपला राज्यात 15 ते 29 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 44 ते 54 जागा मिळू शकतात. जेजेपी आणि मित्र पक्षांना एक, आयएनएडी आणि मित्र पक्षांना एक तर आम आदमी पक्षाला 0 ते एक जागा मिळण्याची शक्यता आहे. ध्रुव रिसर्चनुसार काँग्रेसला 50 ते 56 जागा मिळू शकतात तर भाजपला 22 ते 32 जागांवर विजय मिळू शकतो. पिपुल्स पल्सनुसार भाजपला फक्त 20 ते 32 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 49 ते 61 जागांवर विजय मिळू शकतो. रिपब्लिक भारत मॅट्रिजनुसार काँग्रेसला 55 ते 62 जागा मिळू शकतात. तर भाजपला 18 ते 24 जागांवर विजय मिळू शकतो.

जम्मू कश्मीर एक्झिट पोल

दैनिक भास्करनुसार जम्मू कश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स युतीला 35 ते 40 जागा मिळू शकतात. तर भाजपला 20 ते 25 जागा मिळू शकतात. इंडिया टुडे-सी वोटरच्या सर्वेनुसार काँग्रेल आणि नॅशनल कॉन्फरन्सला 40 ते 48 जागांवर विजय मिळू शकतो. तर भाजपला 27 ते 32 जागा मिळू शकतात. पीपुल्स पल्सनुसार काँग्रेसला 46 ते 50 जागा जिंकू शकते. तर भाजपला 23 ते 27 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.