धनखडांविरोधात अविश्वास प्रस्ताव

राज्यसभेच्या सभापतींचा पक्षपातीपणा दिवसेंदिवस वाढत आहे. विरोधी सदस्यांना बोलूच दिले जात नसल्याचा आरोप करत कॉँग्रेसने सभापती जगदीप धनखडांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे. या प्रस्तावावर विरोधी पक्षाच्या 70 सदस्यांच्या सह्या आहेत.