बाबासाहब का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्थान! ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांचा विराट मोर्चा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनुद्गार काढणाऱ्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारी विजय चौक ते संसद भवन मार्च काढला. यावेळी ‘बाबासाहब का अपमान नही सहेगा हिंदुस्थान…’ अशा घोषणा देत आणि ‘जय भीम’चा नारा देत विरोधकांनी संसद परिसर अक्षरशः दणाणून सोडला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील खासदार मोठ्या संख्येने मार्चमध्ये सहभागी झाले.