हिंदुस्थानात गेल्या वर्षभरात म्हणजेच 2023 मध्ये तब्बल 16 लाख मुलांचे लसीकरण करण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती ‘डब्ल्यूएचओ’ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना आणि ‘युनिसेफ’च्या संयुक्त अहवालातून उघड झाली आहे. त्यामुळे हिंदुस्थानचे भविष्य एनडीए सरकारच्या हाती सुरक्षित नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. कोरोनानंतरही पेंद्र सरकारने कोणत्याच प्रकारचा धडा घेतलेला नसल्याची टीका काँग्रेसने केली असून कमी लसीकरणात नायजेरियानंतर हिंदुस्थानचा क्रमांक लागत असल्याचे वास्तव आहे. दरम्यान, कमी लसीकरणात चीन 20 व्या स्थानावर तर पाकिस्तान 10 व्या स्थानावर आहे. म्हणजेच या दोन्ही देशांहून विदारक स्थिती हिंदुस्थानात असल्याचे अहवालात म्हटले आहे.
2021 नंतर लसीकरणात हिंदुस्थानची रँपिंग घसरत गेल्याचेच दिसत आहे. 2021 मध्ये तर तब्बल 27.3 लाख मुलांना कोणत्याही प्रकारची लस दिली गेली नव्हती. 2021 मधील हा आकडा जगभरात सर्वाधिक होता असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘डब्ल्यूएचओ’ आणि ‘युनिसेफ’ने याच आठवडय़ात 15 जुलै रोजी संयुक्तपणे एक अहवाल प्रसिद्ध केला. 2023 च्या आकडेवारीनुसार नायजेरियात 21 लाख मुलांना कोणत्याही प्रकारची लस दिली गेली नव्हती. त्यानतंर दुसऱया क्रमांकावर हिंदुस्थान आणि त्यानंतर इथियोपिया, कांगो, सुदान आणि इंडोनेशियाचा क्रमांक लागतो तर झीरो लसीकरणात चीन 20 व्या स्थानावर तर पाकिस्तान 10 व्या स्थानावर आहे.
‘डब्ल्यूएचओ’ने व्यक्त केली चिंता
लहान मुले लसीकरणापासून वंचित राहत आहेत. अशा मुलांची वाढत्या संख्येबद्दल ‘डब्ल्यूएचओ’ने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. लसीकरण का होत नाही, नेमकी कुठे चूक होत आहे, नियोजन कुठे फसत आहे, यावर काम करण्याची गरज असल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे.
– तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहीम यशस्वीरीत्या राबवली होती. मोफत लसीकरण करण्यात आले होते, याकडे काँग्रेसने ‘एक्स’द्वारे लक्ष वेधले.
या लसींपासून मुले वंचित
पोलिओ, घटसर्प, धनुर्वात, स्मॉल पॉक्स, कावीळ यांसारख्या आजारांवर हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणावर लस उपलब्ध आहे, परंतु या लसींपासून देशातील मोठय़ा संख्येने मुले वंचित राहील्याचेच उघड झाले आहे.
एनडीए सरकारसाठी शरमेची गोष्ट
देशात लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांचा आकडा वाढतो आहे, पण मोदी मात्र परदेशवाऱया करण्यात आणि पह्टो काढून ते सोशल मीडियात टाकण्यात व्यस्त आहेत. देशात लहान मुलांमध्ये झालेले कमी लसीकरण एनडीए सरकारसाठी अत्यंत शरमेची गोष्ट आहे, अशी टीका काँग्रेसने ‘एक्स’वरून केली आहे.