IND Vs SL Series 2024 : हार्दिक पंड्याचा पत्ता कट; श्रीलंका दौऱ्यात सूर्यकुमार यादवकडे टी-20 संघाचे कर्णधारपद

झिम्बाब्वेला धुळ चारल्यानंतर हिंदुस्थानचा संघ श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टी-20 मालिकेसाठी हार्दिक पंड्या कर्णधार होणार अशा चर्चा समाज माध्यामांवर वाऱ्यासारख्या पसतर होत्या. मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला असून टी20 मालिकेसाठी मुंबईकर सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा कर्णधार असणार आहे. तसेच वन डे मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार असणार आहे.

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर श्रीलंकेविरुद्ध आपल्या प्रशिक्षक म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. श्रीलंका दौऱ्यामध्ये टीम इंडिया 3 वन डे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांचे वेळापत्रक यापूर्वीच जाहिर करण्यात आले आहे. मात्र आता बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे झिम्बाब्वे दौऱ्यावर कर्णधार पदाजी धुरा सांभाळत चमकदार कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलवर टी-20 आणि वन डे मालिकेसाठी उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. टीम इंडियाचा श्रीलंका दौरा 27 जुलै पासून टी-20 मालिकेने सुरू होणार आहे, तर वन डे मालिका 2 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.

टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार). शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद.

वन डे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, के एल राहूल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदिप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.