IND Vs SL 2024 : रोहित, विराटने अखेर गौतम गंभीरच्या शब्दाचा मान राखला

टीम इंडियाच्या आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली उपस्थित नसणार अशा चर्चा रंगत होत्या. मात्र या सर्व चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसणार आहेत.

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालीका ऑगस्टमध्ये पार पडणार आहे. परंतु या मालिकेसाठी अद्याप टीम इंडियाच्या संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु या दौऱ्यासंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेमध्ये खेळताना दिसणार आहेत. विराटने BCCI ला या संदर्भात माहिती दिली आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेमध्ये खेळावे अशी मुख्य प्रसिक्षक गौतम गंभीर यांची प्रमुख मागणी होती. त्यामुळे त्यांच्या मागणीचा मान ठेवत रोहित आणि विराट कोहली एकदिवसीय मालिकेसाठी उपस्थित असणार आहेत.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे 27 जुलै पासून होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार पदाचं कोड अजून सुटलेलं नाही. परंतु सूर्यकुमार यादवच नाव कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.