
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीने चौकार मारत 14 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्याच बरोबर मोहम्मद अझहरुद्दीनाच 25 वर्षांपूर्वीचाही एक विक्रमही त्याने मोडीत काढला आहे.
रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहलीने 15 धावा करताचा विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. फक्त 287 डावांमध्ये सर्वात वेगवान 14 हजार धावा करणारा तो फलंदाज ठरला आहे. याच बरोबर त्याने सचिन तेंडुलकरचा 19 वर्षांपूर्वीच विक्रम मोडीत काढला आहे. सचिन तेंडुलकरने 350 डावांमध्ये 14 हजार धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे वनडे क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट कोहली जगातील केवळ तिसराच फलंदाज आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर (18,426 धावा) आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा (14,239 धावा) यांनाच हा विक्रम प्रस्थापित करता आला आहे.
श्रेत्ररक्षण करत असताना विराट कोहलीने मोहम्मद अझहरुद्दीनाच 25 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. 47 व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने नसीम शाहचा झेल घेतला आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा हिंदुस्थानी खेळाडू होण्याचा बहुमान पटकावला. हा विक्रम मोहम्मद अझहरुद्दीनच्या नावावर होता. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 156 झेल पकडले आहेत. तर विराटने आजच्या सामन्यात 157 वा झेल घेतला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल पकडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली आता तिसऱ्या क्रमांकावर स्थानबद्द झाला आहे. या बाबतीत पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा महेला जयवर्धने (218 झेल) आणि दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग (160 झेल) या खेळाडूंचा समावेश आहे.