पंत आऊट होता का…?

ऋषभ पंत खरोखर बाद होता का ? मैदानात असलेल्या पंचांनी त्याला नाबाद ठरवले होते. तेव्हा न्यूझीलंडने डीआरएस घेत तिसऱया पंचांकडे दाद मागितली. तंत्रज्ञानाच्या मदतीनेही पंतबाबत अचूक निर्णय मिळत नव्हता. एकाच वेळेला चेंडू बॅटच्या समीप आला होता आणि बॅटही पॅडला घासल्याचे जाणवत होते. स्निकोमीटरमध्ये आवाज आल्याचे दिसत होते, पण चेंडू बॅटला लागलाय की बॅट पॅडला लागलीय हे स्निकोमीटरमध्ये स्पष्ट होत नव्हते. अशा संशयास्पद स्थितीत तिसऱया पंचांचा निर्णय मैदानात पंचांनी दिलेल्या निर्णयाच्या बाजूने असणे गरजेचे होते. पण तिसरे पंच पॉल राफेल यांनी निर्णय पंतच्या विरोधात देण्याची चूक केली. हा निर्णय हिंदुस्थानसाठी खूपच दुर्दैवी ठरला. पंत ज्या पद्धतीने खेळत होता. सामना 4-5 षटकांत संपण्याच्या स्थितीत होता, पण राफेल यांच्या वादग्रस्त निर्णयाने पूर्ण सामनाच फिरवला. पंत बाद झाला आणि हिंदुस्थान विजयापासून दूर फेकला गेला. या निर्णयबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी आपला आक्षेप नोंदवला. तसेच रोहित शर्मानेही नाराजी दर्शवली.