Photo – Ind vs Nz 2nd Test वॉशिंग्टन आणि अश्विनने किवींना नाचवले

फोटो - चंद्रकांत पालकर

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरू आहे. पहिल्या दिवशी वॉशिंग्टन सुंदर आणि रविचंद्र अश्विन यांनी आपल्या फिरकीच्या जाळ्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांना अडकवले. त्यामुळे न्यूझीलंडचा पहिला डाव 259 धावांवर संपूष्टात आला.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदाच टीम इंडियाविरद्ध कसोटी सामना खेळण्यासाठी उतरला आहे. 

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. 

मात्र, रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी आपल्या फिरकीच्या तालावर न्यूझीलंडच्या फलंदाजांना नाचवले. 

कॉन्वे (76 धावा), रचिन रवींद्र (65 धावा) आणि सँटनर (33 धावा) यांच्या व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज फिरकीपुढे टीकू शकला नाही.

259 या धावसंख्येवर न्यूझीलंडचा संपूर्ण संघ तंबूत परतला.

वॉशिंग्टन सुंदर याने सर्वोत्तम कामगिरी करत 7 विकेट घेतल्या आणि रविचंद्र अश्विनने 3 विकेट घेतल्या.

प्रत्तुत्तरात टीम इंडियाला पहिला हादरा कर्णधार रोहित शर्माच्या (0 धावा) स्वरुपात बसला. 

दिवसा अखेर टीम इंडियाने 1 विकेट गमावत 16 धावा केल्या आहेत.