IND vs NZ Test – न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात 3 बदल, केएल राहुलला डच्चू!

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथम याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्मय घेतला. या लढतीसाठी हिंदुस्थानच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. बंगळुरू कसोटीत फेल झालेल्या केएल राहुल, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवला डच्चू देण्यात आला असून त्यांच्या जागी आकाश दीप, शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघात स्थान देण्यात आले आहे.

हिंदुस्थानने आपल्या संघात तीन बदल केले, तर बंगळुरू कसोटीत विजयी झालेल्या न्यूझीलंडनेही एक बदल केला. वेगवान गोलंदाज मॅट हेन्री हा बोटाच्या दुखापतीमुळे पुणे कसोटीला मुकला असून त्याच्या जागी फिरकीपटू मिचेल सँटनर याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

पुण्याची खेळपट्टी कोरडी आहे. येथे फिरकीला साथ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यूझीलंडने एक अतिरिक्त फिरकीपटू खेळवला. याबाबत कर्णधार टॉम लेथम यानेही नाणेफेक जिंकल्यानंतर विधान केले.

तो म्हणाला की, गत आठवड्यापेक्षा इतली परिस्थिती वेगळी आहे. बंगळुरूमध्ये खेळपट्टीवर फारसे गवत नव्हते. या खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळेल. गेला सामना जिंकल्यामुळे संघचा आत्मविश्वास दुणावला आहे.