
दुबईत ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज ‘रन’युद्ध रंगणार आहे. दरम्यान टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात आजचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकले असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्याला सुरूवात झाली असून न्यूझीलंडने 3 ओव्हरमध्ये फक्त दहा धावा केल्या आहेत.