रोहित अनलकी कर्णधार; सलग दहाव्यांदा गमावली नाणेफेक, टीम इंडियाचा सलग 13 वेळांचा नकोसा विक्रम

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं पुन्हा एकदा नाणेफेक गमावली आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या नावावर कर्णधार म्हणून नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. तो वनडे सामन्यात सलग 10 वेळा नाणेफेक गमावणारा कर्णधार ठरला आहे. तसेच टीम इंडियाने वनडेत सलग 13 वेळा नाणेफेक गमावल्याच्या विक्रमाची नोंद झाली. याआधी नेदरलँड संघाने सलग 11 वेळा नाणेफेक गमावला होता. हा विक्रम आता टीम इंडियाच्या नावे आहे.

याआधी नेदरलँडच्या संघाने 2011 ते 2013 दरम्यान एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग 11 वेळा नाणेफेक गमावली होती. तर आतापर्यंत टीम इंडियाने सलग 13 वेळा नाणेफेक गमावली आहे. तर आतापर्यंत सलग 10 वेळा रोहित शर्मा नाणेफकीत अनलकी ठरला आहे. मात्र, नाणेफेक गमावल्यावर सामना टीम इंडिया जिंकत असल्याचेही दिसून आले आहे.

आंतरराष्ट्रीय वनडेत सलग सर्वाधिक वेळा टॉस गमावण्याचा विक्रम हा वेस्ट इंडिजचा कर्णधार ब्रायन लाराच्या नावे आहे. लारानं वेस्ट इंडिजचे नेतृत्व करताना ऑक्टोबर 1998 ते मे 1999या कालावधीत सलग 12 वेळा टॉस गमावला होता. नेदरलँडसचा कर्णधार पीटर बोर्रेन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने मार्च 2021 ते ऑगस्ट 2013 या कालावधीत 11 वेळा टॉस गमावल्याचे पाहायला मिळाले. त्यापाठोपाठ मग रोहित शर्माचा नंबर लागतो. रोहित शर्मानं नोव्हेंबर 2023 ते मार्च 2025 या कालावधीत सलग 10 वेळा नाणेफेक गमावली आहे.

नाणेफेक जिंकणे किंवा गमावणे याला फारसे महत्त्व नसून खेळपट्टी पाहून प्रतिस्पर्धी संघाला आपण कसे आव्हान देतो, हे महत्त्वाचे आहे. खेळपट्टीपाहून आम्ही योग्य ते निर्णय घेता. तसेच फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार कामगिरी करत विजय मिळवण्याच्या इर्षेने आपल्या संघाचा प्रत्येक खेळाडू खेळतो. हे विजयासाठी खूप महत्त्वाचे असल्याचे रोहितने सांगितले.