टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (22 जानेवारी 2025) कोलकाताच्या इडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. तसेच संघामध्ये धारधार मारा करणाऱ्या दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.
कोलकाताच्या इडन गार्डन्सवर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पहिला टी-20 सामना खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंडला पाणी पाजण्यासाठी सज्ज झाली आहे. याच दरम्यान इंग्लंडने पहिल्या सामन्यासाठी संघाची घोषणा केली असून कर्णधार पदाची जबाबदारी जोस बटलरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर फिल सॉल्ट आणि बेन डकेट या आक्रमक फलंदाजांचा सुद्दा संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तेज तर्रार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचाही संघात समावेश करण्यात आला आहे. जोफ्रा तब्बल चार वर्षांनी हिंदुस्थानात खेळताना दिसणार आहे. त्याने हिंदुस्थानात शेवटचा सामना 20 मार्च 2021 साली खेळला होता. त्याची धडकी भरवणारी गोलंदाजी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. तसेच वेगवान गोलंदाज मार्क वुडचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
पहिल्या टी-20 सामन्यासाठी इंग्लंडचा संघ
जॉस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस एटकिन्सन, जोफ्रा आर्चर, मार्ग वुड आणि आदिल रशीद.