IND VS ENG – इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्यकुमार कर्णधार; मोहम्मद शमीचे कमबॅक

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून कर्णधार पदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच उपकर्णधार म्हणून फिरकीपटू अक्षर पटेलची निवड करण्यात आली आहे. त्याच बरोबर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची सुद्दा संघामध्ये निवड करण्यात आली आहे.

इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा बीसीसीआयने केली आहे. या 15 सदस्यीय संघात कर्णधारपदी सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधारपदी अक्षर पटेल यांची वर्णी लागली आहे. त्याच बरोबर अभिषेख शर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंगटन सुंदर आणि ध्रुव जुरेल यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.