टी20 मालिकी 4-1 अशा फरकाने जिंकल्यानंतर टीम इंडिया आत वनडे मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. 6 फेब्रुवारी पासून नागपूरमध्ये वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांनी यापूर्वीच संघाची घोषणा केली आहे. परंतु आता टीम इंडियामध्ये अचानक एका फिरकीपटूची निवड करण्यात आली आहे.
टी20 मालिकेत केलेल्या दमदार कामगिरीमुळे वरुण चक्रवर्तीची वनडे मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत वरुण सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. त्याने 14 फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले होते. वरुण चक्रवर्तीने केलेल्या नेत्रदीपक कामगिरीमुळे BCCI ने त्याची टीम इंडियामध्ये निवड केली आहे. त्यामुळे वरुण चक्रवर्ती आपल्या कारकिर्दीतील पहिला वनडे सामना नागपूरमध्ये खेळण्याची शक्यता आहे.
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 6 फेब्रुवारी पासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. उभय संघांमध्ये तीन सामने खेळवण्यात येणार आहे. दुसरा सामना 9 फेब्रुवारी रोजी कटक येथे आणि तिसरा वनडे सामना 12 जानेवारी रोजी अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे.