IND Vs ENG – अभिषेक शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांना फोडलं, 37 चेंडूत ठोकलं धमाकेदार शतक

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडीयमवर पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पाचवा सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरश: फोडून काढले आहे. त्याने तोडफोड फलंदाजी करत फक्त 37 चेंडूंमध्ये शतक ठोकले आहे. अभिषेक शर्माने संजू सॅमसनचा 40 चेंडूंमध्ये शतक ठोकण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. याबाबतीत रोहित शर्माचा विक्रम अबादीत आहे. त्याने 35 चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. टीम इंडियाची फलंदाजी सुरू असून टीम इंडियाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 193 धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंग फलंदाजी करत आहे.