टीम इंडियाचा सुपरस्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत इतिहास रचला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये विकेट्सचे द्विशतक पूर्ण केले. जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा अव्वल फॉर्म फलंदाज ट्रॅव्हिस हेडला बाद करून ही खास कामगिरी केली.कसोटीत 20 पेक्षा कमी सरासरीने 200 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा बुमराह हा जगातील पहिला गोलंदाज आहे.
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात दुसरी विकेट घेत या फॉरमॅटमधील विकेट्सचे द्विशतक पूर्ण केले. 200 किंवा त्याहून अधिक विकेट घेतलेल्या जगातील कोणत्याही गोलंदाजाने 20 पेक्षा कमी सरासरीने विकेट घेतलेल्या नाहीत. जसप्रीत बुमराह हा जगातील पहिला असा गोलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडिजच्या माल्कम मार्शलने 376 विकेट घेतल्या असून त्याची सरासरी 20.94 आहे.