आयकर विभागाकडून स्विगीला तब्बल 158 कोटींची नोटीस

प्रसिद्ध ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीला आयकर विभागाकडून तब्बल 158 कोटी रुपयांची नोटीस मिळाली आहे. स्विगीने एक्सचेंज फाईलमध्ये ही माहिती दिलीय. या नोटिसीवर उपायुक्त, सेंट्रल पार्क बंगळुरू असे लिहिले आहे. आयकर विभागाच्या नोटिसीविरोधात कंपनी अपील करणार आहे, असे स्विगीने म्हटले आहे. आयकर विभागाच्या या नोटिसीचा स्विगीवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही स्विगीने म्हटले आहे.